Mumbai Mulund: मुलुंडमध्ये फुटपाथ लायब्ररी सुरु, कादंबरीसह शेकडो पुस्तकं ABP Majha
मोबाईल्स, टीव्ही, कॉम्प्युटरच्या जमान्यात वाचनसंस्कृती लोप पावत चाललीय. त्यासाठी मुंबईतल्या मुलुंडमध्ये फुटपाथवर खुलं ग्रंथालय सुरु करण्यात आलं आहे. रंगकौशल्य कट्टा या संस्थेच्या वतीनं हे खास ग्रंथालय सुरु करण्यात आलं आहे. या ग्रंथालयात अनेक ग्रंथ, कादंबऱ्या, शालेय पुस्तकं, विविध स्पर्धा परीक्षांची पुस्तकं यासारखी विविध पुस्तकं पाहायला मिळत आहेत.