Mumbai : MPSC पूर्वपरीक्षा, विद्यार्थी गोधळात; मुंबईतील परीक्षा केंद्रावरुन माझाचा आढावा ABP Majha
एमपीएससीची पूर्वपरीक्षा आज होतेय. मात्र या परीक्षेतही विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. या परीक्षेसाठी दहा वाजताची वेळ होती तर रिपोर्टिंग वेळ सकाळी साडेनऊची होती. मात्र मुंबईत परीक्षा केंद्र असलेल्या उमेदवारांना रिपोर्टिंग वेळेत पोहोचायला पाच ते दहा मिनिटे उशीर झाला. त्यामुळे पेपर देण्यापासून रोखल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. अनेक परीक्षार्थी वर्षभरापासून या परीक्षेसाठी तयारी करतात. मात्र पेपर सुरु झाला नसतानाही केवळ रिपोर्टिंग वेळेत न पोहोचल्याने विद्यार्थ्यांना पेपरला मुकावे लागतंय. विद्यार्थी पालकांनी परीक्षा नियंत्रकाला विनंती करुनही परीक्षेला बसू न दिल्याचा आरोप होतोय.
मुंबईतील सिडनहॅम कॉलेज केंद्रावरुन आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी...