Mumbai Monorail Breakdown | चेंबूर-भक्तीपार्क मोनोरेलमध्ये गुदमरले प्रवासी, आज घटली संख्या

मुंबईमध्ये चेंबूर ते भक्तीपार्कदरम्यान काल संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास मोनोरेल बंद पडली. म्हैसूर कॉलोनी स्टेशनजवळ ही घटना घडली. मोनोरेलमधील एसी बंद पडल्यामुळे प्रवाशांना गुदमरल्यासारखे झाले. क्रेनच्या मदतीने दोन तासांच्या प्रयत्नानंतर प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. काही प्रवाशांना अस्वस्थता जाणवली, परंतु सुदैवाने सर्व प्रवाशांची सुटका झाली. या प्रकारामुळे सर्वसामान्यांना धडक बसली असून, आज मोनोरेलमध्ये प्रवाशांची संख्या लक्षणीय घटलेली दिसली. मोनोरेल ठप्प होण्याचे मुख्य कारण क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असणे हे सांगितले जात आहे. मोनोरेलची क्षमता १०४ टन वजन पेलवण्याची आहे, मात्र दुर्घटनेच्या वेळी मोनोरेलमध्ये १०९ टन वजन होते. क्षमतेपेक्षा पाच टनाने वजन जास्त झाल्यामुळे पॉवर रेल आणि करंट कनेक्टरचा संपर्क तुटला. यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आणि एसी बंद पडले, ज्यामुळे प्रवासी आतमध्ये गुदमरू लागले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola