Mumbai | अख्खं लालबाग-परळ जिथे जन्माला आलं ते वाडिया हॉस्पिटल व्हेंटिलेटरवर, कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू | ABP Majha
Continues below advertisement
अख्खं लालबाग परळ जिथे जन्माला आलं ते वाडिया हॉस्पिटल व्हेंटीलेटरवर असून वाडिया हॉस्रिटल प्रशासनानं निधी अभावी नव्या रुग्णांचे अँडमिशन थांबवले आहे. उपचार घेत असलेल्या 300 हून अधिक रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मँटर्निटी डिपार्टमेंटचे 100 पेशंट घरी पाठवले तर बोनमॅरो ट्रान्सप्लांट, हृदयरोग, मूत्रपिंड इत्यादी सर्व शस्त्रक्रिया बंद केल्या आहेत. शस्त्रक्रियांपासून बाह्य़रुग्णापर्यंत सर्व विभाग हळूहळू बंद करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. पालिका, राज्य सरकार आणि रुग्णालय प्रशासनाच्या वादाचा फटका मात्र रुग्णांना बसत आहे. बाई जेरबाई वाडिया रुग्णालयाचे ३० कोटी आणि नौरोजी वाडिया रुग्णालयाचे १०५ कोटी असे सुमारे १३५ कोटी रुपये पालिकेकडे थकित आहेत. वाडिया रुग्णालयाला मागील तीन वर्षांपासूनच्या थकीत रकमेपैकी केवळ १३ कोटी रुपये देण्यात आले आहेत.
Continues below advertisement