MNS Protest Siddhivinayak Mandir : भाविकांनी दिलेल्या देणगीचा गैरव्यवहार, मनसेचं मंदिरासमोर आंदोलन
सिद्धिविनायक मंदिर न्यासातल्या कथित अनागोंदी कारभाराची आणि आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी मनसेच्या वतीनं आज मोर्चा काढून करण्यात आली. मनसे नेते यशवंत किल्लेदार यांच्या नेतृत्वाखाली आगर बाजारापासून सिद्धिविनायक मंदिरापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकरांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि त्यानंतर घोषणाबाजी करत चौकशीची मागणी केली. सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी देणगी स्वरूपात दिलेल्या पैशांचा आणि इतर कामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा मनसेचा आरोप आहे.