MNS March against Inflated Power Bills | आगे आगे देखिए होता है क्या? संदीप देशपांडेचं सूचक वक्तव्य
वाढीव वीज बिलाच्या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली असून आता जनतेला न्याय देण्यासाठी आज संपूर्ण राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चे आयोजित केले आहेत. आज संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्यात येणार आहे. एकाच वेळी संपूर्ण राज्यात निघणाऱ्या या मोर्चामध्ये लाखो लोक सामील होतील असे नियोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आले आहे. मातोश्रीवर मोर्चा न काढता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढतोय हेच पोलिसांना केलेलं सर्वात मोठं सहकार्य आहे, अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली. तसंच आगे आगे देखिए होता है क्या? असं सूचक वक्तव्यही केलं.