Agitation for Marathi | मराठीची शिकवणी घ्यायची ठरवलं तर दोन दिवसात पोपटासारखं बोलतील: संदीप देशपांडे
मराठीत बोलण्याची विनंती केल्याने अपमानास्पद वागणूक देणाऱ्या सराफाविरोधात लेखिका शोभा देशपांडे यांचा कालपासून रस्त्यावरच ठिय्या सुरु आहे. मुंबईतील कुलाब्यात घडलेल्या या प्रकरणात आता मनसेने उडी घेतली आहे. मराठी भाषेचा आग्रह धरणाऱ्या महिलेला अपमानास्पद वागणूक देणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र नवनिर्माण सेना धडा शिकवेल, असा इशारा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला आहे. तसंच महाराष्ट्रात राहून मराठी भाषा बोलण्यास नकार देणाऱ्यांना आता मनसेची शिकवणी सुरु करण्याची वेळ आली आहे, असंही ते म्हणाले.