Mumbai : भेसळयुक्त खाद्यतेलाचा मनसेकडून भांडाफोड,अन्न व औषध प्रशासन विभागाचं दुर्लक्ष : ABP Majha

Continues below advertisement

नालासोपारा परिसरात सुरु असलेल्या भेसळयुक्त खाद्यतेलाचा मनसेनं भांडाफोड केला आहे. नालासोपारा फाटा येथे अनधिकृत गाळ्यांमध्ये भेसळयुक्त खाद्यतेल बनवण्यात येत होतं. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि कार्यकर्त्यांनी या गाळ्यावर धाड टाकली. या गाळ्यांमध्ये एकाच तेलातून पामतेल, रिफाईन्ड तेल आणि झिरो कोलेस्ट्रोल असलेलं सनफ्लॉवर तेल बनवलं जात होतं. हे खाद्यतेल वसई विरारसह आजूबाजूच्या परिसरात वेफर्स आणि फरसाण बनवण्यासाठी वापरलं जातं होतं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram