Metro 3 : मुंबई मेट्रो-3ची चाचणी यशस्वी, Eknath Shinde - Devendra Fadnavis यांच्या हस्ते हिरवा झेंडा
Continues below advertisement
वादग्रस्त ठरलेल्या मुंबईतील कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावरच्या मेट्रो-3ची चाचणी पार पडली... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चाचणीला हिरवा झेंडा दाखवला... आरेच्या सारीपुत नगर ते मरोळ नाका अशी 3 किमीपर्यंतची चाचणी करण्यात आली... मुंबई मेट्रो-3ला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय... मेट्रो-3चा वाद हा राजकीय होता अशा शब्दांत फडणवीसांनी ठाकरेंवर निशाणा साधला... मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतला नसता तर मेट्रो आणखी 4 वर्षे खोळंबली असती असा टोलाही त्यांनी ठाकरेंना लगावलाय.. कांजुर कारशेडच्या मुद्द्यावरुनही फडणवीस यांनी ठाकरेंना लक्ष्य केलं.. कारशेड हा इगोचा विषय नसल्याची टीकाही फडणवीस यांनी केलीय...
Continues below advertisement