Mumbai Metro 3 : कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावरच्या मेट्रो-३ची आज चाचणी होणार : ABP Majha
वादग्रस्त ठरलेल्या कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावरच्या मेट्रो-३ची आज चाचणी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेट्रो ३ ची ट्रायल होणार आहे. आरेच्या सारीपुत नगर इथल्या ट्रॅकवर ही चाचणी होणार आहे. मुंबई मेट्रो-३च्या कारशेडवरुन सध्या मोठा वाद सुरु आहे.. ठाकरे सरकारने रद्द केलेल्या आरे कारशेडला शिंदे-फडणवीस सरकारने मंजुरी दिली.. त्यानंतर आरेमध्ये कारशेड होऊ नये यासाठी पर्यावरणवादी आक्रमक झालेत.. आरे कारशेडविरोधात आंदोलनं होतायत, असं असतानाही आरेमध्ये कारशेड होणार यावर शिंदे-फडणवीस सरकार ठाम आहे.. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे... आरे कारशेडविरोधातील सात याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात एकत्र सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायायल आरे कारशेड संदर्भात काय निर्णय देणार याकडं लक्ष लागलंय...