Mumbai : पाकिस्तानातील धुळीचं वादळ मुंबईत! हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे म्हणतात...

 बुलेटिनच्या सुरुवातीलाच राज्याला सतर्क करणारी बातमी पाकिस्तानात निर्माण झालेलं धुळीचं वादळ गुजरातवाटे महाराष्ट्रात पोहोचलंय. उत्तर कोकण आणि मुंबईला याचा मोठा फटका बसताना दिसतो. या धुळीच्या वादळानं मुंबई आणि परिसरात वातावरण सकाळपासूनच धुरकट बनलेलं आहे. कालपासून मुंबईत ढगाळ वातावरण आहे त्यात आता धुळीचे कण मिसळल्यानं दृष्यमानता अजूनच कमी झालेली आहे. वातावरणात अचानक झालेल्या या बदलांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं आणि काहीसं संभ्रमाचं वातावरण आहे. या धुळीमुळे मानवी जीवनावर काय परिणा होतात, नागरिकांना काय काळजी घ्यावी लागेल याच्या मार्गदर्शक सूचना प्रशासनानं द्याव्या अशी मागणी नागरीक करत आहेत.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola