Mega Block Mumbai : मुंबईत रविवारी अनेक मार्गांवर Mega Block, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरविवारी म्हणजे उद्या मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण दरम्यान 8 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल... त्यामुळं लोकल उशिरानं धावणार आहेत...या ब्लॉकमुळे जलद मार्गावरील लोकल ठाणे ते कल्याण दरम्यान धीम्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत. या स्थानकांदरम्यान दोनच मार्ग उपलब्ध असल्याने लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावणार असून प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. कुर्ला ते वाशी दोन्ही मार्गावरही मेगाब्लॉक आहे. ब्लॉकमुळे सीएसएमटी ते वाशी, बेलापूर पनवेल दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 .वाजेपर्यंत लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यानही अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ब्लॉक घेऊन विविध कामे केली जाणार आहेत. धीम्या मार्गावरील लोकल या दोन स्थानकादरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील.