Mumbai Mega Block | मध्य रेल्वे, Harbour Line वर Mega Block, प्रवाशांना फटका
Continues below advertisement
तांत्रिक कामं आणि देखभाल दुरुस्तीसाठी मध्य रेल्वेवर विद्याविहार आणि ठाणे या स्थानकांदरम्यान तसेच हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशीदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुख्य मार्गांवरील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर सकाळी आठ ते दुपारी दीड पर्यंत हा ब्लॉक असणार आहे. कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गांवर सकाळी अकरा दहा ते सायंकाळी चार दहा वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या मार्गिकेमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. प्रवाशांना यामुळे काही प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
Continues below advertisement