Mayor Kishori Pednekar : आक्षेपार्ह्य ट्वीटवर महापौर किशोरी पेडणेकर यांचं स्पष्टीकरण; म्हणाल्या...

Continues below advertisement

Mayor Kishori Pednekar : आक्षेपार्ह्य ट्वीटवर महापौर किशोरी पेडणेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाल्या...

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सध्या ट्विटरवर जोरदार ट्रोल होत आहेत. किशोरी पेडणेकर यांनी एका चॅनेलला दिलेली मुलाखत आपल्या ट्विटर हँडलवर ट्वीट केली होती. त्यात त्यांनी मुंबईसाठी 1 कोटी लसीकरण करण्याचा मानस बोलून दाखवला आणि त्यात 9 कंपन्यांचा उल्लेख केला होता. या ट्वीटखाली एका व्यक्तीनं 'कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं?' असा प्रश्न विचारला असता, महापौरांनी उद्धट भाषेत उत्तर दिल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातोय. काही वेळानं हा रिप्लाय डीलीट करण्यात आला. मात्र आता त्याचा स्क्रीनशॉट ट्विटरवर चांगलाच व्हायरल होत आहे. यासंदर्भात महापौर किशोरी पेडणेकरांना विचारलं असता त्यांनी ते ट्वीट एका शिवसैनिकानं केलं होतं, आणि आता त्याची हकालपट्टी केल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. माध्यमांशी बोलताना महापौरांनी यासंदर्भात खुलासा केला. 

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर बोलताना म्हणाल्या की, "काल (बुधवारी) बीकेसीमध्ये कार्यक्रम होता. त्यावेळी माझ्यासोबत शाखाप्रमुख आणि कार्यकर्ते होते. माध्यमांच्या प्रतिनिधींनाही माहीत आहे की, कोणताही कार्यक्रम असेल तर मी माझ्यासोबत मोबाईल ठेवत नाही. मी त्या कार्यकर्त्याकडे मोबाईल दिला. माझा मोबाईल कधीही कोणी घ्यावा आणि चेक करावा, त्याला लॉक नसतो. बसल्या बसल्या त्यानं कदाचित चाळलं असावं. त्यावर अनेक आक्षेपार्ह्य ट्वीट असतात, त्याबद्दल शंकाच नाही. त्यानं रागाच्या भरात ते ट्वीट केलं. त्यानंतर माझ्या हातात मोबाईल आल्यावर मी चेक केलं. माझ्या लक्षात आलं की, त्यानं ही मोठी चूक केली आहे. असं करु नये. कोणी कितीही वाईट वागत असलं तरी आपण वागू नये. या मताची मी आहे. तुम्ही एरवीही माझं वर्तन पाहिलेलं आहे. मी कधीही असं गैरवर्तन करत नाही. मी तत्काळ ते ट्वीट डिलीट केलं. त्या कार्यकर्त्याचीही हकालपट्टी केली आहे."

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram