Mumbai Unlock : मुंबईकरांनो गर्दी करु नका, अन्यथा कठोर निर्बंध : महापौर किशोरी पेडणेकर
मुंबई : कोरोनाच्या धर्तीवर लागू करण्यात आलेल्या कठोर नियमांमध्ये दीर्घ प्रतीक्षेनंतर शिथिलता आणण्यात आली. कोरोना रुग्णसंख्येचा आलेख राज्यासह मुंबईतही उतरणीला लागल्याचं लक्षात येताच मायानगरीला पुन्हा रुळावर आणण्यासाठी काही नियम शिथिल करण्यात आले. याचे थेट पडसाद मुंबईत नियमांमध्ये शिथिलता येण्याच्या पहिल्याच दिवशी दिसून आहे.
शहरात येणाऱ्या वाशी, दहिसर, मुलुंड या मुख्य प्रवेशांच्या ठिकाणी वाहनांची तोबा गर्दी पाहायला मिळाली. त्याप्रमाणेच बाजारपेठांमध्येही दुकानं सुरु झाल्यामुळं अनेक मुंबईकरांनी या ठिकाणचीही वाट धरली. नियमांमध्ये शिथिलता मिळालेली असली तरीही कोरोना संपलेला नाही, ही बाब मात्र मुंबईकर सपशेल विसरुन गेल्याचं चित्र दिसून आलं. त्याचमुळे मुंबईकर अशीच गर्दी करत राहिले तर कठोर निर्णय़ घ्यावा लागेल असा थेट इशारा शहराच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.