Mumbai Coronavirus | महापौर किशोरी पेडणेकर यांची मुंबईत गस्त; मास्क न घालणाऱ्यांवर धडक कारवाई

Continues below advertisement

बई : 'ए बाळा, मास्क लाव ना रे, शो ला ठेवलास का?' 'ओ दादा मास्क लावा, नाहीतर फाईन भरावा लागेल.' 'जर तुमच्यासारखे वकीलच असे वागत असतील तर कसं चालेल?' या सूचना आहेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या. महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज भायखळा ते सीएसएमटी प्रवास करुन स्टेशनची पाहणी केली. लोकल ट्रेन तसंच प्लॅटफॉर्मवर जे लोक मास्क न घालता फिरताना दिसले त्यांना महापौरांनी कडक कारवाईचा इशारा दिला. मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे.

महापौरांनी आज भायखळा ते सीएसएमटी असा प्रवास केला. यावेळी त्यांनी सगळ्यांना कोरोनाविषयक नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं. तसंच गरज पडेल तिथे अनेकांना कडक शब्दात सुनावत कारवाईचा इशाराही दिला. तर काहींना हात जोडून मास्क घालण्याची विनंती केली.

या कारवाईदरम्यान किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, "महापौर हे पदच लोकांसाठी आहे. लोकांमध्ये जनजागृती करणं गरजेचं आहे. लोकांना समजावून सांगितलं पाहिजे. मास्क नसेल तर दिला पाहिजे. मुंबईकरांनी आतापर्यंत चांगली साथ दिली, यापुढेही देतील. जे काही दहा टक्के लोक आहेत, जे वेगवेगळे प्रश्न विचारुन संभ्रम निर्माण करत आहेत, त्यांना उत्तर देणं गरजेचं नाही. आपण कामातून उत्तर देऊ. आता वाढणारा कोरोना रोखायचा असेल तर मास्क वापरणं गरजेचं आहे आणि तो नाकावर असणं अनिवार्य आहे."

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram