Mumbai : 1140 पैकी 960 मशिदींना, तर 2400 पैकी अवघ्या 24 मंदिरांना भोंग्यांची परवानगी Loudspeaker Row

Continues below advertisement

राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी सर्वच धार्मिक स्थळांना भोंग्यांबाबत नोटीस बजावली आहे.. मात्र मुंबईत या भोंग्यांच्या परवानगीबाबत एक आकडेवारी आयुक्तांनी दिलेय... मुंबईतल्या ११४० पैकी ९३० मशिदींकडे भोंग्यांसाठी परवानगी आहे  तर २४०० पैकी अवघ्या २४ मंदिरांनी भोंगे लावण्याची परवानगी घेतल्याचं समोर आलंय. काल मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सर्वधर्मीयांची बेैठक घेतली. आयुक्तांनी या बैठकीत सर्वधर्मीयांना भोंगे वाजवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांबाबत माहिती दिली. ज्यांनी भोंगे लावण्यासाठी परवानगी मागितली आहे त्यांची कागदपत्र तपासून त्यांना परवानगी दिली जाईल असं आयुक्तांनी सांगितलंय मात्र ही परवानगी सकाळी ६ ते रात्री १० या कालावधीसाठीच असणार आहे.. त्या व्यतिरिक्त दिवसाच्या इतर वेळी भोंगे लावता येणार नाहीत. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram