Teachers Issue | मराठी शिक्षक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला | मुंबई | ABP Majha
मातोश्रीवर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेल्या शिक्षक उमेदवारांना मुख्यमंत्र्यांनी बैठकीसाठी बोलावलं आहे. मंत्रालयातील सातव्या मजल्यावरील ७१७ क्रमांकाच्या रुममध्ये मुख्यमंत्रीउ उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे या शिक्षक उमेदवारांना भेटणार आहे. मराठी माध्यमातून शिकल्यानं महापालिकेच्या शिक्षक भरतीत नाकारल्य़ानं शिक्षक संतप्त आहेत. तर, त्य़ासंदर्भात आक्षेप नोंदवण्यासाठी याआधीही शिक्षक उमेदवार मुंबईच्या महापौरांना भेटायला गेले होते पण दोन तास थांबूनही महापौरांनी त्यांना भेट दिली नाही.. त्यामुळे त्यांच्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यासाठी आज शिक्षक उमेदवारांनी मातोश्री गाठली.