BMC Mayor Election | काय आहे मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल? | ABP Majha
मुंबई महापालिकेसंदर्भात एक मोठी बातमी...भाजप-शिवसेनेत काडीमोड झाल्यानंतर आता मुंबई महापालिकेत महापौर पदासाठी शिवसेना भाजपात रस्सीखेच सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेनेला महापौर पदापासून रोखण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरु केल्याचं दिसून येत आहे. त्यासाठी भाजपनं काँग्रेसला संपर्क केल्याचा दावा मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केलाय. तर शिवसेनेकडून महापौर पदासाठी यशवंत जाधव यांचं नाव निश्चित मानलं जात आहे. त्याचबरोबर आशिष चेंबुरकर, विशाखा राऊत, मंगशे सातमकर आणि किशोरी पेडणेकर यांचीही नावं चर्चेत आहेत.