Mumbai Rains | तरुणाचं प्रसंगावधान, मुंबईत नाल्यातून वाहून जाणाऱ्या चिमुकल्याला वाचवलं!

मुंबईतील सांताक्रूझमधील वाकोला परिसरात नाल्यातून वाहून जाणाऱ्या एका चिमुकल्याला वाचवण्यात यश आलं आहे. स्थानिकाने प्रसंगावधान दाखवून नाल्यात उडी मारली आणि त्या मुलाला वाचवलं. या मुलाला आता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
वाकोल्यातील आग्रीपाडा इथल्या त्रिमूर्ती चाळीत नाल्याला लागूनच दुमजली घर होतं. मुंबई आणि उपनगरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे हे घर कोसळलं. घरात पाणी घुसल्याने चिमुकला पाण्याच्या प्रवाहासह वाहून गेला. मुलगा नाल्यातून वाहून जात असल्याचं लक्षात येताच नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. मुलाला वाचवण्यासाठी आरडाओरडा सुरु झाला. त्याचवेळी तिथे असलेल्या एका तरुणाने नाल्यात उडी मारली आणि वाहून जाणाऱ्या मुलाला वाचवलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola