Mumbai Mahada home : मुंबईत म्हाडाच्या चार हजार घरांची लवकर लॉटरी, दिवाळीच्या म्हाडाकडून गिफ्ट
मुंबईत घरं घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे... दिवाळीत मुंबईमध्ये चार हजार घरांची लॉटरी काढण्यासाठी म्हाडाने तयारी सुरु केलीय. लवकरच त्याची अधिकृत घोषणा केली जाईल...त्यामुळे तीन वर्षांपासून म्हाडाच्या घरांच्या सोडतीची मुंबईकरांची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे