Mumbai: बाजारात नुकसान,उपसलं अपहरणाचं हत्यार, थेट शेअर ब्रोकरचं अपहरण ABP Majha
किडनॅपिंगचा हा सगळा थरार घडलाय..बोरिवली पोलीस स्टेशनच्या हद्दीत..बोरिवली येथे राहणारे प्रियांक लखानी हे शेअर ब्रोकरचं काम करतात...अक्षय सुराणा नावाच्या व्यक्तीनं प्रियांककडे गुंतवणुकीसाठी पैसे दिले...आणि शेअर बाजारात हे पैसे बुडाले...आणि त्यानंतर अक्षयने लखानी यांच्या किडनॅपिंगचा कट रचला..२७ जानेवारीला अक्षय त्याच्या मित्रांना घेऊन बोरीवलीतील भगवती हॉटेलजवळ आला...तिथे प्रियांक लखानीला जबरदस्तीनं गाडीत बसवलं