Mumbai Lok Sabha Election Result : मुंबईत कोण आघाडीवर कोण पिछाडीवर? कुणाला धक्का?

Continues below advertisement

Mumbai North West Lok Sabha Constituency Election Result 2024 :  मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena UBT) आणि शिवसेना शिंदे (Shiv Sena Shinde Group) गटात जोरदार चुरस सुरू आहे. ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) आणि शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्यात जोरदार चुरस आहे. सकाळी 11.30 वाजता पिछाडीवर असलेले अमोल किर्तीकर यांनी रविंद्र वायकर यांच्यावर पाचव्या फेरीत चार हजार मतांची आघाडी घेतली आहे.  अजूनही मतमोजणी सुरू आहे. 

शिवसेना ठाकरे गटाकडून अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) मैदानात असून त्यांच्यांविरोधात शिवसेना शिंदे गटाकडून आमदार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) मैदानात उतरले आहेत. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघापैकी मुंबई वायव्य (Mumbai North West Lok Sabha) हा एक महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे. या लोकसभा मतदारसंघात मराठी मतदारांसह अन्य भाषिक मतदारांची मोठी संख्या आहे. त्याशिवाय विविध धर्मीय मतदार आहेत. शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) फुटीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.

वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात अमोल किर्तीकर आणि रविंद्र वायकर  यांच्यात थेट लढत झाली. मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाच्या टक्केवारीत किंचित वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. या मतदारसंघात 9 लाख 51 हजार 580 मतदानाची नोंद करण्यात आली असून 54.84 टक्के मतदान झाले. 

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा निकाल 2024 (Mumbai North West Lok Sabha Election Result 2024)

उमेदवाराचे नाव मिळालेली मते (पाचव्या फेरी अखेर) निकाल
अमोल किर्तीकर (शिवसेना ठाकरे) 1, 07, 934 आघाडीवर
रविंद्र वायकर (शिवसेना) 1,07,343  
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram