Mumbai Lockdown Update : Lockdown नाही, जिल्हाबंदी नाही - आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या वेगानं वाढत असली तरी लोकल बंद करण्याचा कोणताही विचार नाही असं स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्ट केलंय. तसंच तूर्तास तरी लॉकडाऊन लावण्याचा आणि जिल्हाबंदी लागू करण्याचा राज्य सरकारचा विचार नसल्याचंही राजेश टोपेंनी सांगितलंय. आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी कोरोना स्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलही उपस्थित होते. या बैठकीनंतर राजेश टोपेंनी माध्यमांशी संवाद साधला.