Mumbai Local | नियोजनबद्ध पद्धतीनेच सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु- विजय वडेट्टीवार
सर्वसामान्य प्रवाशांसाठी मुंबई लोकल सुरु करण्याचा हा निर्णय राज्यसरकारने विचार करुन घेतला आहे आणि नियोजनबद्ध पद्धतीनेच लोकल सेवा सुरु करण्यात येतील असे राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. मास्कचा वापर करणे , रेल्वेच्या नियमांचे पालन करणे या गोष्टी प्रवाशांनी केल्या तर परिस्थिती सर्वसामान्य होण्यास मदत होईल असेही ते म्हणाले.