Mumbai Local Train | अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबई लोकल सुरु

राज्य सरकारच्या मागणीनुसार मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील कर्माचाऱ्यांसाठी मर्यादित स्वरुपात मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा आजपासून (15 जून) सुरु झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे जवळपास अडीच महिन्यांपासून मुंबईची लाईफलाईन अर्थात लोकल सेवा बंद होती. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर अप-डाऊन अशा लोकलच्या 346 फेऱ्या असतील.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola