Mumbai Local Pass : रेल्वे पाससाठी ही कागदपत्र आवश्यक ABP Majha
प्रशांत बढे, एबीपी माझा
Updated at:
11 Aug 2021 11:03 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोनामुळे सामान्यांचा लोकल प्रवासाला ब्रेक लागला होता, मात्र १५ ऑगस्टपासून तुमचा आमचा लोकल प्रवास पुन्हा सुरु होतोय. आणि त्यासाठी आजपासून क्यूआर कोड पास मिळायला सुरुवात झाली आहे. लोकल पास मिळवण्यासाठी सकाळपासूनच प्रमुख रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी धाव घेतली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लशीचे दोन डोस घेतलेल्यांनाच लोकल प्रवासाचा पास मिळणार आहे... त्यासाठी रेल्वे स्थानकांत लशीच्या प्रमाणपत्राची ऑफलाईन पडताळणी करण्यात येतेय... मुंबईतल्या आणि लगतच्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावरुन क्यूआर कोड पास प्रक्रियाचा आढावा एबीपी माझाचे प्रतिनिधी घेत आहेत..