Mumbai Local Mega Block : रविवारी मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
रविवारी मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक आहे. उपनगरीय रेल्वे मार्गाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर, हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशीदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असेल. या ब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांना रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ट्रान्सहार्बर मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे, पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक असेल.