Mumbai Local | जानेवारीपासून मुंबई लोकल सुरु करण्याचा विचार : विजय वडेट्टीवार

Continues below advertisement

जानेवारीपासून मुंबई लोकल सुरु करण्याचा विचार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. त्यामुळे सरकार मुंबई लोकल सुरु करण्याचा विचार करत असून यासंदर्भात तयारीही सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरु होणार, असा प्रश्न सध्या सर्वांच्याच मनात आहे. अशातच मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबई लोकल संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे.

मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बोलताना सांगितलं की, "मुंबई आणि महाराष्ट्राची कोरोना स्थिती हळूहळू पूर्वपदावर आलेली आहे. मला वाटतं की, लोकल सुरु होण्यासाठी आणखी थोडा वेळ जाईल. पण जानेवारीमध्ये लोकल सुरु करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही." पुढे बोलताना ते म्हणाले की, "डिसेंबरचे साधारण 15 दिवसांमध्ये घटती कोरोनाची रुग्ण संख्या, तसेच नव्या रुग्णांची संख्या लक्षात घेतली जाईल. तसेच कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती वर्तवण्यात येत होती. ती आता निवळली आहे. त्यामुळे 31 डिसेंबरनंतर नववर्ष, जानेवारीमध्ये आम्ही लोकल रुळावर आणू. तसेच सर्वसामान्यांची सेवा सुरु होईल हा विश्वास आहे."

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram