Corona : मुंबईच्या लोकलमध्ये गर्दी कायम, नियंत्रण आणण्याची प्रवासी संघटनेची मागणी
Continues below advertisement
मुंबई कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, उपनगरीय लोकल गाड्यांमध्ये गर्दीचं चित्र कायम आहे. या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकलची गर्दी कमी करण्यासाठी सरकारी, खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती 50 टक्के करावी, अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे. सध्या मुंबई लोकलमधून दररोज सरासरी 40 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत आहेत. त्यामुळे या गर्दीवर नियंत्रण मिळवलं नाहीतर कोरोनाची स्थिती आणखी चिंताजन होईल, असा दावा प्रवासी संघटनांनी केलाय.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Mumbai Local Local Train Omicron Omicron Mumbai Mumbai Omicron Omicron Cases India Omicron