Mumbai Juhu Beach : जुहू चौपाटीवर पोहायला गेलेल्या 6 जणांपैकी 4 जण बेपत्ता, दोघांना वाचवण्यात यश
मुंबईतल्या जुहू चौपाटीवर पोहायला गेलेल्या सहा मुलांपैकी चार मुलं बेपत्ता झालीयत. उरलेल्या दोन मुलांना सुखरुप वाचवण्यात स्थानिक नागरिकांना यश आलं आहे. जुहू कोळीवाडा परिसरात आज संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. ही सहाही मुलं सांताक्रुझ पूर्वच्या वाकोला परिसरातून पोहण्यासाठी जुहू कोळीवाडा चौपाटीवर आली होती. चौपाटीवर असलेल्या नागरिकांनी बुडणाऱ्या दोन मुलांना वाचवलं असून, चार मुलं अजूनही बेपत्ता आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि मुंबई महापालिका यांच्या वतीनं स्थानिक पोलिसांच्या सहकार्यानं शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.