Measles outbreak in Mumbai : मुंबईत गोवर आजाराचा विळखा वाढला, मागील 2 महिन्यात गोवरचे 84 रुग्ण

Continues below advertisement

मुंबईमध्ये गोवर रुग्णांमध्ये वाढ झालीये.. मुंबईत गोवर उद्रेकाची स्थिती असल्याचं समोर आल्यानंतर केंद्राकडून देखील दखल घेण्यात आलीये..  केंद्रीय पथकाकडून काल गोवरचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या एम-पूर्व विभागात जात ठिकठिकाणी पाहणी करण्यात आली. आजही केंद्रीय पथकाकडून आढावा घेतला जाणार आहे. मागील दोन महिन्यात गोवरचे 84 रुग्ण समोर आले आहेत. महापालिकेकडून गोवरचा उद्रेक झालेल्या विभागात विविध उपाययोजनेला सुरुवात करण्यात आली आहे.  आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जात गोवर संशयित रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत असून संशयित रुग्णांना जीवनसत्व अ देण्यात येतंय. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram