Mumbai Iqbal Singh Chahal: मुंबईत लॉकडाऊन लागणार का? ऐका आयुक्तांकडून ABP Majha
Continues below advertisement
मुंबईत २० हजार रुग्ण रोज आढळले, तर लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे सूतोवाच महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी केले होते. त्यामुळे मुंबईकरांमध्ये संभाव्य लॉकडाऊनविषयी भिती आणि चिंतेचं वातावरण होतं. मात्र, आता खुद्द पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनीच संपूर्ण लॉकडाऊनची शक्यता फेटाळून लावली आहे. मुंबईतली सध्याची परिस्थिती पाहाता मुंबईत लॉकडाऊनची गरज नाही, असं आयुक्त चहल यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलं आहे. मुंबई लोकलमधून ६० लाख लोक प्रवास करत आहेत. सगळ्यांनी लशीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. त्यामुळे तिथे निर्बंध घालण्याची गरज नाही असही इक्बालसिंह चहल यांनी म्हटलंय.
Continues below advertisement