Mumbai IIT : मुंबई आयआयटीतील हॉस्टेल कॅन्टीनमध्ये पुन्हा नवा वाद
मुंबई आयआयटीतील हॉस्टेल कॅन्टीनमध्ये पुन्हा वाद सुरु झालाय. शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी सहा राखीव टेबल ठेवण्यात आलेत. तर या निर्णयाला आंबेडकरी संघटनांनी विरोध केलाय. विद्यार्थ्यांमध्ये कॅन्टीनमध्ये जेवताना कुठल्याही प्रकारे असा भेदभाव आतापर्यंत केला जात नव्हता. विद्यार्थी समजूतदार पद्धतीने मांसाहारी शाकाहारी जेवण या एकाच कॅन्टीनमध्ये जेवत असत. पण या निर्णयामुळे एक प्रकारे जातीभेदाला प्रोत्साहन दिले जात असल्याचं संघटनेचे म्हणणे आहे.