ABP News

The Best Bakery Case ते Hasan Mushrif Case, दोन महत्वांच्या प्रकरणावर आज कोर्टात सुनावणी

Continues below advertisement

2002 मध्ये गुजरातमधील वडोदरा इथं गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या हिसांचारातील एक गाजलेलं प्रकरण म्हणजे बेस्ट बेकरी हत्याकांड. या घटनेत जमावानं 14 जणांना अतिशय निर्घृणपणे मारलं होतं. या प्रकरणातील दोन फरार आरोपिंविरोधात मुंबई सत्र न्यायालयाताल विशेष कोर्टात नुकताच खटला पूर्ण झाला आहे. त्यावर कोर्टानं आपला निकाल राखून ठेवला आहे... आज यावर निकाल येणं अपेक्षित आहे.. तर दुसरीकडे हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालय निकाल देणार आहे.  मुश्रीफांना अटकेपासून कोर्टानं दिलेलं संरक्षण निकालापर्यंतच कायम आहे. मुश्रीफ यांच्यावर सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात आर्थिक अफरातफर केल्याचा आरोप आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram