Mumbai High Court : वयाच्या 45 नंतर अनुकंपा तत्वावर नोकरी देता येणार नाही - मुंबई उच्च न्यायालय
Continues below advertisement
अनुकंपा तत्वावरील नोकरी वयाच्या 45 वर्षानंतर देता येणार नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने एका निकालात दिला आहे. महिलेला दया दाखवून वयाच्या 45 वर्षानंतरही अनुकंपा तत्त्वाचा लाभ दिला तर वय उलटून गेलेल्या दावेदारांची नोकरीसाठी रांग लागेल, असं हायकोर्टाने या निकालात नमूद केलं आहे. कोल्हापूरच्या प्रकरणात मॅटने दिलेला आदेश हायकोर्टाने रद्द केला आहे.
Continues below advertisement