Mumbai : रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला खडसावलं
Continues below advertisement
फोन टॅपिंग प्रकरणात माजी गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. रश्मी शुक्ला यांना आरोपी बनवणार की नाही? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला केला आहे. जर आरोपी बनवणार नसाल अन्यथा याचिका ऐकायला लावून कोर्टाचा वेळ फुकट घालवू नका, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला खडसावलं, सोमवारपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे राज्य सरकारला निर्देश देण्यात आले आहेत.
Continues below advertisement