Mumbai Govinda Will go to Spain : मुंबईतील गोविंदा पथक दहीहंडी स्पर्धेसाठी स्पेनला जाणार

स्पेनमधल्या बार्सिलोनामध्ये होणाऱ्या मानवी मनोऱ्यांच्या स्पर्धेत मुंबईतल्या गोविंदाचं पथक सहभागी होणार आहे. मुंबईकर गोविंदांच्या या पथकात ३२ जणांचा समावेश असून, या पथकानं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. मुंबई आणि ठाण्यातल्या दहीहंडीसाठी गोविंदा पथकं जसे उंच मनोरे रचतात, त्याच धर्तीवर स्पेनमध्ये कॅसलर्स ऑफ कॉन्कर्स ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. यंदा १ आणि २ ऑक्टोबरला या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यात भारतासह ४० देशांचा समावेश आहे. या स्पर्धेतल्या सहभागासाठी मुंबईकर गोविंदांना मुख्यमंत्र्यांनी आर्थिक सहाय्य केलं आहे.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola