
Goregaon Fire Update : मुंबईच्या गोरेगाव येथे अग्नितांडव, दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू तर 40 जण जखमी
Continues below advertisement
मुंबईच्या गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झालाय. ४० जण जखमी झालेत.तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तर जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आगीत ३० पेक्षा अधिक दुचाकी आणि ४ कार जळून खाक झाल्यात. तसेच तळमजल्यावरील काही दुकानंही जळून खाक झालेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं असून, सध्या कुलिंगचं काम सुरु आहे.
Continues below advertisement