Mumbai Goa Highway : मुंबई गोवा मार्गावरुन जड वाहनांची वाहतूक सुरुच, कालचा बंदी आदेश हवेतच विरला
Continues below advertisement
मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसे आक्रमक झालीय. आणि या महामार्गाचं जवळपास १५ वर्षांपासून रखडलेलं कामं वेगानं काम व्हावं, यासाठी मनसेची जागर यात्रा सुरू झालीय. अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही जागर यात्रा सुरू झालीय. अमित ठाकरेंची पळस्पे फाटा ते खारपाडा पदयात्रा सुरू झालीय, तर बाळा नांदगावकर यांचीही पेणमधील तरणखोपपासून जागरयात्रा सुरू झालीय. या शिवाय संदीप देशपांडे, राजू पाटील आदी नेते वेगवेगळ्या ठिकाणाहून जागर यात्रेत सहभागी झालेत. १५ हजार कोटी रुपये खर्चुनही मुंबई - गोवा पूर्ण न झाल्याचा जाब मनसे या जागर यात्रेतून विचारत आहे. मनसेचे सर्व नेते जागर यात्रा घेऊन संध्याकाळी कोलाडमध्ये येतील. आणि तिथं राज ठाकरेंच्या भाषणाने जागर यात्रेचा समोराप होईल.
Continues below advertisement
Tags :
Bala Nandgaonkar MNS Leadership Mumbai - Goa Highway Amit Thackeray Padyatra MNS Aggressive Stalled Works Jagar Yatra Palaspe Phata To Kharpada