Mumbai Girl Molestation in Local : Grant Road Station जवळ धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai Girl Molestation in Local : Grant Road Station जवळ धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग
पश्चिम रेल्वेवरील ग्रॅन्ट रोडजवळ धावत्या लोकलमध्ये एका तरुणाने २४ वर्षीय तरुणीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. या तरुणाविरोधात मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मालाड येथे राहणारी तरुणी शुक्रवारी रात्री कामानिमित्त चर्नी रोड येथे लोकलने जात होती. ग्रॅन्ट रोड स्थानक येताच एका तरुणाने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. तसेच अश्लील चाळे, अश्लील वक्तव्य करीत तो तरुणीला त्रास देत होता. संबंधित तरुणीने आरडाओरडा केला असता त्या तरुणाने लोकलचा वेग कमी होताच उडी मारून पळ काढला. याप्रकरणी बुधवारी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात तरुणीने तक्रार दाखल केली. या आधारे पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.