Mumbai Rains | मुंबईत पूर्व आणि पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस, सखल भागांत पाणीच पाणी
हवामान खात्याच्या वतीने 2 आणि 3 जुलैला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार आज सकाळपासूनच मुंबईसह उपनगरात पावसाने दमदार सुरुवात केली आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व उपनगरात जोरदार पाऊस सुरु आहे. जोरदार पावसामुळं सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.दादर, माटुंगा, वरळी, लालबाग, सायन, कुर्ला, अंधेरी या परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. सायन, हिंदमाता, वरळी नाका परिसर जलमय झाल्याचे चित्र आहे. हिंदमाता परिसरातील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे. तर पावसामुळे पाणी साचलं असल्यानं अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.