Rishi Kapoor Passes Away | ऋषी कपूर यांच्यावर आज अंत्यसंस्कार, 15 ते 20 जण उपस्थित राहणार
बॉलिवूड विश्वाला सलग दुसऱ्या दिवशी धक्का बसला आहे. हरहुन्नरी कलाकार इरफान खान यांनी काल जगाला अलविदा केल्यानंतर आज बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील सर एच एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर मरिन लाईन्स इथल्या चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. यावेळी 15 ते 20 जण उपस्थित राहणार आहेत.