Railway Job Fraud | रेल्वेत नोकरीचं अमिष देऊन 96 लाखांची फसवणूक | ABP Majha
Continues below advertisement
मुंबईत रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोन जणांची तब्बल 96 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी घाटकोपर येथील पंतनगर पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आलाय. ((तक्रारदार नरसिम्हा लिख्खी यांच्या माहितीनुसार भुपेंद्र रावल, त्याचा मुलगा कुणाल रावल आणि मुलगी रिंकल ठक्कर यांनी संगनमताने रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने जवळपास 70 जणांची फसवणूक केलीय. रेल्वेत टीसी पदासाठी या भामट्यांनी प्रत्येकी 8 लाख रुपये घेतले आहेत. यासाठी त्यांनी घरातच बनावट ऑर्डर, स्टॅम्प तयार करुन रेल्वे प्रशासनाची देखील फसवणूक केली आहे.
Continues below advertisement