परंपरा खंडीत करणारा लॉकडाऊन, नारळी पौर्णिमेआधीच जीव धोक्यात टाकत मासेमारीला सुरुवात
उद्या नारळी पौर्णिमा आहे. परंपरेप्रमाणे नारळी पौर्णिमेपासून कोळीबांधव मासेमारी सुरु करतात. मात्र यंदा कोरोना लॉकडाऊनमुळं पौर्णिमेच्या बरेच दिवस आधीपासून कोळी बांधव आपला जीव धोक्यात घालून मच्छीमारीसाठी समुद्रात जात आहेत. गेल्या चार महिन्यापासून कोरोनामुळे घरात बसून असल्यामुळे त्यांना घर चालवणं अवघड झालेलं आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक बंदरांवर छोट्या छोट्या बोटी मासेमारीसाठी खवळलेल्या समुद्रात जात असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.