GST Bhavan Fire | स्वत:चा जीव धोक्यात घालून आगीपासून राष्ट्रध्वज वाचवणारा शिपाई | ABP Majha
जीएसटी भवनाच्या आगीत शिपाई कुणाल जाधव यांनी प्रसंगावधान राखत 9 मजल्यावरील तिरंगा सुरक्षित उतरवला आहे. त्यांच्या या कृतीमुळे सर्वजण त्यांचं कौतुक करतायेत. आगीच्या झळा हळुहळू ध्वजापर्यंत पोहचत होत्या. मात्र, जीवाची पर्वा न करता कुणाल यांनी तिरंगा ध्वज सन्मानपूर्वक खाली उतरवला. देशप्रेमातून ही कृती केल्याचं कुणाल यांनी सांगितलं. मुंबईतील माझगाव परिसरात असलेल्या जीएसटी भवनच्या आठव्या मजल्यावर भीषण आग लागली होती. दरम्यान, तीन तासांनंतर आग आटोक्यात आली आहे.