Mumbai Film City च्या कॅन्टीनचा प्रश्न शासन दरबारी; जागा रिकामी करण्यावर फिल्मसिटी ठाम

Continues below advertisement

मुंबई : गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरी आणि तिथे कॅन्टीन चालवणारे लक्ष्मण गायकवाड यांचा वाद आता सरकार दरबारी गेला आहे. कोर्टाने चित्रनगरीच्या बाजूने निकाल दिल्यानंतर प्रशासनाने गायकवाड यांना 48 तासांची मुदत देऊन कॅन्टीन मोकळे करायला सांगितलं होतं. पण गायकवाड यांनी स्वतःला कॅन्टीनमध्ये कोंडून घेत आपल्यावर अन्याय झाल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

फिल्मसिटीमध्ये 1995 पासून गायकवाड कॅन्टीन चालवतात. करार संपल्यानंतर फिल्मसिटी प्रशासन आणि गायकवाड यांच्यात काही वर्षपासून वाद सुरु आहे. 2010 ला संपला, मग पुन्हा करार केला. दरम्यान गायकवाड कोर्टात गेले. 2016 च्या दरम्यान कराराची मुदत संपली. मग लक्ष्मण गायकवाड यांनी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच पत्र घेऊन कॅन्टीन चालवले. आता 2018 ला ती मुदत संपली. गेली दोन वर्षे अवैध रीतीने कॅन्टीन चालू असल्याचा दावा फिल्मसिटी करते. शिवाय यातून फिल्मसिटीला भाडेही नाही. मग हा वाद कोर्टात गेला. तो निकाल फिल्मसिटीच्या बाजूने लागला. दुसरिकडे गायकवाड यांनी कमर्शिअल भाडेही देत नसल्याचा दावा फिल्मसिटी करते आहे. दरम्यान कॅन्टीनची जागा ही शासनाची जागा आहे. आता रिकामी करणार असल्याचं फिल्मसिटी म्हणते.

गायकवाड यांना तिथून घालवण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून कॅन्टीनचे लाईट पाणी फिल्मसिटीने बंद केलं आहे. पण फिल्मसिटीच्या जॉईंट एमडी अचला गोयल या जातीने गायकवाड यांच्या तब्येतीवर लक्ष ठेऊन आहेत. गायकवाड आता शासन काय म्हणते त्याकडे लक्ष ठेवून आहेत. ते, पत्नी आणि 25 कर्मचारी यांनी कॅन्टीन मध्येच मुक्काम केला आहे.

आज फिल्मसिटीमध्ये या वादावर तोडगा काढण्यासाठी शिष्टमंडळाची बैठक झाली. त्यानुसार शासनाने सांगितलं तर आपण ही जागा सोडू असं गायकवाड एबीपी माझाला म्हणाले. तर जागा आपली असूनही भाडे नाही व खाद्य पदार्थ ही उत्तम दर्जाचे नसल्याने नवी टेंडर्स काढण्याचा प्रस्ताव फिल्मसिटीच्या विचाराधीन आहे. येत्या दोन तीन दिवसात यावर तोडगा निघायची शक्यता आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram