Mumbai EPFO Fraud : मुंबईच्या PF कार्यालयात कोट्यवधींचा घोटाळा , द इंडियन एक्स्प्रेसचं वृत्त
Continues below advertisement
आता समस्त कर्मचारी वर्गाशी संबंधित पीएफसंदर्भात मोठी बातमी... तुमच्या आमच्या कमाईवर आणि जमापुंजीवर डल्ला मारल्याची घटना घडलीए. मुंबईच्या पीएफ कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी २१ कोटींचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मार्च २०२० ते जून २०२१ दरम्यान, संपूर्ण देश कोरोना संकटात असताना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या म्हणजेच ईपीएफओच्या मुंबई कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सामान्य व्यक्तींच्या नावावर २१ कोटींचा डल्ला मारल्याचं कळतंय. त्यासाठी ८१७ बँक खात्यांचा वापर करण्यात आल्याची माहिती आहे. द इंडियन एक्सप्रेसच्या अंतर्गत चौकशीच्या तपशीलांनुसार ही माहिती समोर आली आहे.
Continues below advertisement