Mumbai Electricity : मुंबईत प्रचंड उकाडा, विजेची मागणी 3500 मेगावॅटवर; सोमवारी विजेची विक्रमी मागणी

Continues below advertisement

मुंबईच्या वीजमागणीने सोमवारी साडे तीन हजार मेगावॉटचा टप्पा पार केला. मुंबईची आजवरची कमाल वीजमागणी एप्रिल २०२२मध्ये ३,८०० मेगावॉटची असली, तरी या मोसमात पहिल्यांदाच साडे तीन हजार मेगावॉटचा टप्पा पार झाला आहे. मागील आठवड्यातील वीजमागणी सरासरी ३२०० मेगावॉटदरम्यान असताना, सोमवारी एकाएकी ३०० मेगावॉटची वाढ दिसली. मुंबईची वीजमागणी सहसा सरासरी २४०० ते २६०० मेगावॉटदरम्यान असते. करोना संकटानंतर ही सरासरी २८०० ते तीन हजार मेगावॉटच्या घरात गेली. तर मागील उन्हाळ्यात सरासरी ३२०० ते ३३०० मेगावॉटदरम्यान होती. यंदा मात्र मार्चमध्ये ऊन तापू लागल्यापासून सातत्याने मुंबईची वीजमागणी तीन हजार मेगावॉटच्या वरच आहे. सोमवारी दुपारी २.४० वाजता मागणीने ३,५३२ मेगावॉटचा उच्चांक गाठला. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram