Mumbai : मुंबईसह राज्यातील वीज दरवाढीचा बॉम्ब शुक्रवारी फुटणार, नवे वीजदर 1 एप्रिलपासून लागू होणार
Continues below advertisement
मुंबईसह राज्यातील वीज दरवाढीचा बॉम्ब शुक्रवारी फुटणार आहे. वीज कंपन्यांनी सादर केलेल्या वीज दर निश्चितीच्या याचिकेवर महाराष्ट्र वीज नियामक आयोगासमोर जनसुनावणी पार पडली आहे. तसेच नवे वीजदर 1 एप्रिलपासून लागू करावे लागणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर वीज आयोगाचे वीज दराचे आदेश तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून ते महिन्याच्या अखेरच्या दिवशी आपला आदेश जारी करणार आहे. त्यामुळे वीज नियामक आयोग काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement